मतदारांकडून भरघोस प्रतिसाद ; ठिकठिकाणी उमेदवारांचे भव्य स्वागत

शिरसोली ता. जळगाव (प्रतिनिधी ) ;-
येथील ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहचत असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या शिरसोली प्र. न.च्या परिवर्तन ग्रामविकास पॅनलने प्रचारात झंझावाती आघाडी घेतली असून ठिकठिकाणी मतदारांकडून भरघोस प्रतिसाद मिळत असून भव्य स्वागत केले जात आहे .

वार्ड क्रमांक १ चे उमेदवार मधुकर प्रल्हाद आंबटकर, आशाबाई संतोष माळी, वार्ड क्रमांक ४ चे उमेदवार नीलिमा योगेश बारी , ज्योती संजय सूर्यवंशी,निलेश प्रमोद वाणी ,वार्ड क्रमांक ५ चे उमेदवार ज्योतिबाई विलास माळी, अनिता उमाजी पानगळे . शेनफडू नामदेव पाटील, वार्ड क्रमांक ६ चे उमेदवार सखुबाई विठाराम पाटील,मंगलाबाई ज्ञानेश्वर मराठे (नाना हवालदार यांच्या पत्नी ), व मुदस्सर बशीर पिंजारी असे परिवर्तन ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांची नावे असून त्यांनी आपल्या झंझावाती प्रचाराला जोरदार प्रारंभ केला आहे . गावचा विकास खुंटला असून गावाच्या सर्वांगीण विकासाठी आपले आशीर्वादरूपी मतदान द्यावे असे आवाहन सर्वच उमेदवारांनी मतदारराजाला केले आहे . आज रविवार १० रोजी ढोलताशांच्या गजरात उमेदवारांनी झंझावाती प्रचार केला .ठीक ठिकाणी माता भगिनींनी उमेदवारांचे स्वागत करून औक्षण करीत विजयाचा आशीर्वाद दिला . तसेच यावेळी उमेदवारांनी गावच्या विकासाकरिता परिवर्तन ग्राम विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना बहुमतांनी निवडून द्यावे असे आवाहन केले . गावात पथदिवे, पक्के रस्ते , गटारी , पिण्याचे पाणी , स्वच्छता आदी मूलभूत प्रश्न आहेत. तरुण वर्गासाठी अभ्यासिका आणि प्रशिक्षण वर्ग सुरु करणार असून नागरिकांसाठी आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर आयोजित केले जाणार आहे. गोरगरिबांसाठी घरकुल योजना , महिलांसाठी बचत गट निर्माण करून त्यांच्या सबलीकरणासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे . उमेदवारांच्या विजयासाठी गावातील नागरिक सहकार्य करीत असून उमेदवारांना मिळणारा भरघोस पाठिंबा पाहता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. ठिकठिकाणी उमेदवारांना मिळणारा प्रतिसाद पाहता परिवर्तन ग्राम विकास पॅनलच्या सर्वच उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गावाचा सर्वांगीण विकास हा ठरलेला असून मतदारांच्या पाठिंब्यावर उमेदवारांनी आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले आहे. प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहचला असल्याने आबालवृद्ध उमेदवारांच्या विजयासाठी आपापले भरीव योगदान देत आहे .







