• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी आणखी 40 कोटी रुपये निधी वितरित – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 8, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील देयके अदा करण्यासाठी आणखी 40 कोटी रुपये निधी मंजूर करून वितरित करण्यात आला असून, येत्या काही दिवसातच लाभार्थी विद्यार्थ्यांच्या संलग्न खात्यांवर ही रक्कम जमा करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

दहावीपुढील उच्च शिक्षण घेत असलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा शैक्षणिक व उदरनिर्वाह खर्च भागविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती देण्यात येते. ऑगस्ट 2020 मध्ये या योजनेअंतर्गत प्रलंबित देयके अदा करण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठ्या प्रयत्नाने 35 कोटी रुपये निधी वित्त विभागाकडून मंजूर करून घेत वितरित केला होता.

अनेक योजनांना त्यांच्या एकूण वार्षिक लक्ष्य रकमेवर निर्बंध लादण्यात आलेले आहेत. परंतु या परिस्थितीतही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांना व त्यांच्या हक्काचा निधी मिळण्यात खीळ बसू नये या भावनेतून मंत्री मुंडे सातत्याने पाठपुरावा करत होते. वित्त विभागाने 40 कोटी रुपयांची मागणी मंजूर करून हा निधी वर्ग केल्यानंतर मंत्री मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

सन 2020-21 या आर्थिक वर्षात या योजनेचे एकूण उद्दिष्ट 100 कोटी रुपये इतके असून, मंत्री धनंजय मुंडे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आर्थिक निर्बंध बाजूला ठेवत आतापर्यंत योजनेची 75% उद्दिष्टपूर्ती साध्य झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच या योजनेची व्याप्ती मंत्री मुंडे यांनी मोठी शहरे व जिल्ह्याची ठिकाणे यांपासून विस्तार करत तालुका स्तरापर्यंत वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्यानंतर बाकी असलेली देयके देण्यासाठी आणखी 40 कोटींचा निधी तातडीने उपलब्ध करून दिल्याने कोरोनाच्या या काळात विद्यार्थ्यांना निश्चितच दिलासा मिळणार आहे. यासाठी गेल्या काही दिवसात अनेक विद्यार्थी संघटनांनी मागणी केली होती. या सर्व संघटनांनी मंत्री मुंडे यांचे आभार मानले आहेत.


 

 

Previous Post

जळगावात सट्टा खेळणाऱ्यास अटक

Next Post

लस घेतलेल्या लाभार्थ्याच्या बोटावर शाई – आरोग्यमंत्री

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लस घेतलेल्या लाभार्थ्याच्या बोटावर शाई - आरोग्यमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!
1xbet russia

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

March 2, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

March 2, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाच्या खर्चात महावितरणमुळे

March 2, 2026
पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

March 2, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon