जळगाव;- येथील नवीन बस्थानकात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशाचा अज्ञात चोरट्याने मोबाईल लंपास केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली असून याप्रकरणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, पारोळा येथील कासार गल्लीत जितेंद्र हुकूमचंद शर्मा (रा. पारोळा) हे कुटूंबियांसह वास्तव्यास आहेत़ काही कामानिमित्त ते खंडवा येथे गेले होते. मंगळवार, ५ जानवोरीला ते जळगाव नवीन बसस्थानकावर पारोळा जाण्यासाठी पोहोचले़ रात्री ८़३० वाजेच्या सुमारास फलाटावर पारोळा बस लागली़ बसमध्ये चढत असताना गर्दी झाली. त्यावेळी चोरट्याने त्यांच्या खिशातील दहा हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला़ बसमध्ये चढल्यानंतर त्यांनी खिशाला हात लावला असता, मोबाईल गायब झालेला दिसून आला. शुक्रवारी जितेंद्र शर्मा यांनी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








