मुंबई (वृत्तसंस्था) – महापौर किशोरी पेडणेकर यांना फोन करुन अर्वाच्य भाषा वापरून धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी गुजरातच्या जामनगर येथून बुधवारी अटक करण्यात आली आहे. आरोपीला आज न्यायालयात हजर केले असता 10 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे. 22 डिसेंबरला सायंकाळी 6 वाजता महापौर किशोरी पेडणेकर यांना एक फोन आला होता. एका अज्ञात व्यक्तीने महापौरांना फोनवर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती.
धमकीच्या फोननंतर दोन दिवसांनी महापौरांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर 261/2020 नोंदवला होता. मुंबई पोलिसांनी मोबाईल क्रमांकवरुन मनोज दोढीयाचा शोध घेतला असुन त्याला गुजरातच्या जामनगर ताब्यात घेतले आहे. 20 वर्षीय मनोज दोढीया या युवकाने हे कृत्य का केले आहे याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत.








