जामनेर प्रतिनिधी:- जामनेर पंचायत समिती मधील हीवरखेडा बुद्रुकचे गटनेते तसेच माजी भा.ज. यु.मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे युवा नेतृत्व अमर पाटील यांनी मंगळवारी सहायक प्रशासन अधिकारी के.बी.पाटील यांच्या हाती अचानक राजीनामा देऊन ऐन ग्राम पंचायत निवडणूक वेळी राजकीय गोटात गोंधळ उडवला. पाटील हे पंचायत समितीच्या कारभार पासून यापूर्वीही नाराज असल्याचे दिसून आल्याचे कळते. यंदा ही त्यांनी हिवरखेडा ग्राम पंचायतीत पक्षातीलच काही वरिष्ठ नेते हस्तक्षेप करत असून त्या कारणाने त्यांनी राजीनामा दिला असावा असे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही.








