जळगाव ;- तालुक्यातील भादली येथील २३ वर्षीय तरूणीने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची आज सकाळी उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यातअकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.खूशबू गोपाळ चौधरी (वय-२३) रा. भादली ता.जि.जळगाव असे या मयत तरुणीचे नाव आहे .

खूशबू गोपाळ चौधरी हिने राहत्या घरात कोणीही नसतांना गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ९ ते १० वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. भादली गावात तिची आई एका लग्नसमारंभाच्या ठिकाणी गेली होती . . तर वडील शेतात गेले होते. तिने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी डॉ. कुरकुरे यांनी मयत घोषीत केले.मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला असता नातेवाईकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती .







