चाळीसगाव;- जगभरात कोरोना या व्हायरसने थैमान घातले असून त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारत देशात लॉक डाऊन केले गेल्यानंतर हात मजुरी करणाऱ्या बेसहारा कुटुंबांना चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या पोलिसांच्या पगारातून किराणा वस्तू असलेल्या किटचे तेल, साखर, पिठ, तांदुळ ,चहा,अशा (19 वस्तु) वाटप करण्यात आले आज सकाळी 11 वाजता सुंदरबाई पुंडलिक पवार या बेसहारा महिलेस कीट देऊन समाजाप्रती असलेली आपली कर्तव्य भावना लक्षात घेऊन माणुसकीचे दर्शन घडवणार्या उपक्रमाची सुरुवात विभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे व शहर पोलिस स्टेशनचे पो. नि.श्री.विजयकुमार ठाकुरवाड व त्यांचे सहकारी अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत देण्यात आला पहिल्या टप्प्यात 121 कुटुंबांना घरपोच कीट देण्याचा मानस असून पुढील टप्प्यात अजून या किटचे वाटप करण्यात येईल यावेळी श्री कैलास गावडे यांनी सांगितले की पोलिस हे नेहमीच कडक भूमिका घेणारे किंवा कायद्याची अंमलबजावणी करणारे नसतात त्यांच्यात पण एक सामाजिक कार्यकर्ता दडलेला असतो असे त्यांनी बोलून दाखविले तसेच पो.नि.विजयकुमार ठाकुरवाड यांनी सांगितले की हातमजुरी करणाऱ्या कुटुंबांना अडचणीच्या काळात पोलिसांनी स्वयंस्फूर्तीने पगारातून काही पैसे जमा करून या किटचे वाटप करण्यात येत आहे चाळीसगाव पोलिसांच्या या माणुसकीच्या दर्शन घडवणाऱ्या संकल्पाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.