जळगाव;- शहरामध्ये वाढत्या खड्ड्यांमुळे जळगावकर नागरिकांना पाठीचे व मणक्याचे आजार उद्भवत आहे सर्वसामान्य जळगावकरांचा खड्ड्यांमुळे जगणं मुश्किल झाला आहे सत्ताधारी भाजपने निवडणुकीच्या वेळेस जळगाव शहराचा कायापालट करू असे आश्वासन दिले होते. मात्र सत्ताधारी भाजपला या आश्वासनाचा विसर पडलाय की काय असा थेट सवाल राष्ट्रवादीने उपस्थित केला आहे . आमदार राजूमामा भोळे यांनी निवडणुकीच्या वेळेस चीड येते का खड्ड्यांची असे घोषवाक्य काढले होते. मात्र भाजपची सत्ता येऊन दोन वर्ष उलटून गेले तरी सत्ताधारी भाजपला खड्ड्यांचा विसर पडला आहे . माजी मंत्री गिरीश महाजन यांनी मोठे दावे वादे केले होते. आम्हाला फक्त शंभर दिवस सत्ता द्या आम्हीच शहराचा कायापालट करू मात्र कायापालट तर सोडाच जळगाव मध्ये खड्ड्याची समस्या ही सुटले नाही . जळगावकर नागरीकांना रोज खड्यांच्या समस्यांमुळे अपघाताला सामोरे जावे लागत आहे . सत्ताधारी भाजपचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादीने चक्क खड्ड्यांमध्ये केक कापून खड्ड्यांचा वाढदिवस साजरा केला . राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षण विभागातर्फे हे आयोजन करण्यात आले होते . राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षण विभागातर्फे हे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षण चे महानगर जिल्हाध्यक्ष साहिल पटेल यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले . याप्रसंगी राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षण विभागाचे जिल्हाध्यक्ष साहिल पटेल ,अशोक लाडवंजारी, कैसर काकर, ममता तडवी ,पंकज नाले विशाल देशमुख , जयेश पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती.








