जामनेर (प्रतिनिधी) – स्टेट इनोहेशन अँड रीसर्च फाउंडेशन महाराष्ट्र( सर फाउंडेशन) हे देशातील शिक्षकांचे एक अग्रगण्य नेटवर्क आहे. शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी नाविन्य पूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून 2006 पासून भारत देशात कार्यात आहे.
देशातील अग्रगण्य नेटवर्कच्या जामनेर तालुका समन्वयकपदी जामनेर तालुक्यातील खडकी येथील जिल्हा परिषदेतील शाईळेतील शिक्षक आणि अनिल विष्णू माळी व महिला प्रतिनिधी म्हणून पहूर पेठ कन्या शाळेच्या उपशिक्षिका मंगला विश्वनाथ मेहेत्रे यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा समन्वयक निलेश शेळके व अरुणा उदावंत यांनी निवड केली असून या शिक्षकांचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील, शिवसेना नेते गणेश पांढरे यांनी अंभिनदन केले आहे.








