जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज रविवार दि.२७ डिसेंबर रोजी पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात एकुण ३३ रूग्ण बाधित आढळून आले आहे. तर ३५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. यात जिल्ह्यातील एकुण पाच तालुक्याचा अहवाल निरंक असल्याचे दिसून आले आहे. एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.


भडगाव, यावल, रावेर, चाळीसगाव, आणि बोदवड तालुका निरंक आढळून आला आहे. तर जळगाव शहर – ९ , जळगाव ग्रामीण -१, भुसावळ-१, अमळनेर-१, चोपडा-७ , पाचोरा-२, धरणगाव-१, एरंडोल-१, जामनेर-१, पारोळा-२, मुक्ताईनगर-५ आणि इतर जिल्ह्यातील २ असे एकुण ३३ बाधित रूग्ण आढळले आहे.
जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज रविवार दि.२७ डिसेंबर रोजी पाठविलेल्या अहवालात जिल्ह्यात एकुण ५५ हजार ६५४ बाधित रूग्ण आढळले आहे. त्यापैकी ५३ हजार ९१९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ४१५ बाधित रूग्ण विविध ठिकाण उपचार घेत आहे. आज एका रूग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.







