चाळीसगाव येथे शिवनेरी फाउंडेशन भूजल अभियान व पंचायत समितीच्या विद्यमाने ग्रामसेवकांची कार्यशाळा

चाळीसगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव येथे शिवनेरी फाऊंडेशन संचलित भुजल अभियान अंतर्गत,दि. २२ डिसेंबर रोजी सहज जलबोध अभियान चाळीसगांव आणि पंचायत समिती चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुक्यातील कार्यरत असणाऱ्या ग्रामसेवकांसाठी गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यशाळेत शिवनेरी फाउंडेशन संचलित चाळीसगाव तालुक्यात सुरू असलेल्या भूजल अभियानाचा परिचय गुणवंत सोनवणे यांनी ऑनलाइन पद्धतीने करून दिला. त्याच बरोबर सहज जलबोधकार उपेन्द्र धोंडे यांनी सहज जलबोध अभियानाचा नेमकं काय त्याची रूपरेषा स्थानिक पातळीवर कोणती कामे चालणार आहेत, त्यासाठी भूजल टीम काय काय करेल, सहज जलबोध तंत्र कस असेल याची सखोल माहिती ग्राम विस्तार अधिकारी यांना करून दिली.
आदर्श भूजल आराखडा ही संकल्पना महेंद्र पाटील यांनी मांडली. त्याचबरोबर निसर्ग बेट संबंधातील सखोल माहिती राहुल राठोड यांनी दिली. याचबरोबर मनरेगा जलसंवर्धन व पुढील नियोजन यासंदर्भात अमूल्य असे मार्गदर्शन तालुक्याचे गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी केले. खर तर जलसंधारण आणि मृदा संधारणा ची ही काम ग्राम पातळीवर राबविणे गरजेची असतात आणि रूट लेवलची संपूर्ण माहिती ग्रामविकास अधिकारी यांनाच जास्त असते त्यांनी या कामासाठी पुढे यावे आणि भूजल अभियानाला सर्वोतोपरी मदत करावी असे आवाहन गट विकास अधिकारी वाळेकर यांनी केले.
सदर कार्यशाळेचे सूत्र संचालन भूजल अभियान प्रमुख विजय कोळी यांनी केले तर सम्राट सोनवणे यांनी आभार मानले. सदर कार्यशाळेला तालुक्यातील संपूर्ण ग्रामसेवक मंडळी हजर होती.







