प्रफुल्ल लोढा हे राष्ट्रवादीचे साधे सभासदही नाहीत – अॅड. रवींद्रभैय्या पाटील
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यात आज सावदा ,जामनेर , जळगाव यासह जिल्ह्यात विविध ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला असला तरी राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी प्रफुल्ल लोढा यांच्यावर आरोप करताना ते बेवड्या आणि दारुड्या व्यक्ती असून त्यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही असा घणाघाती आरोप त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केला. तसेच दुसऱ्या पत्रकार परिषदेत प्रफुल्ल लोढा हे राष्ट्रवादीचे साधे सभासदही नाहीत असा आरोप जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्रभैय्या पाटील यांनी केला असल्याने याचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटले असून यामुळे राजकीय वादंगाला नव्या रूपाने रंग भरला आहे.
एकनाथराव खडसे पत्रकार परिषदेत काय बोलले …. !
एकनाथराव खडसे यांनी म्हटले ३० डिसेंबर २०२० रोजी हजर राहण्याचे समन्स ईडीचे मला मिळाले आहे. मी याला हजर राहणार आहे. यापूर्वी अँटीकरप्शन पुणे आणि नाशिक, आयकर विभाग , रुटिंग समिती यांनी चौकशी केली आहे . आम्ही चौकशीला सहकार्य केले आहे . त्यांना कागदपत्रे दिली आहे असे सांगत त्यांनी भोसरीच्या भूखंडावर हि चार वेळा चौकशी झाली आहे . आता पाचव्यांदा चौकशी असून त्यांना आपण सहकार्य करू असे सांगितले असले तरी त्यांना आपले पूर्ण सहकार्य असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली .यावेळी काल झालेल्या प्रफुल्ल लोढा यांच्या पत्रकार परिषदेत तुमच्यावर झालेल्या आरोपांबाबत विचारले असता एकनाथराव खडसे म्हणाले कि , एका दारुड्या आणि बेवड्याची मीडिया दखल घेत असलेले पत्रकार दखल घेत असतील त्यांचे कौतुक असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढून आपली नाराजी व्यक्त केली .
प्रफुल्ल लोढा हे राष्ट्रवादीचे साधे सभासदही नाहीत – अॅड. रवींद्रभैय्या पाटील
जामनेर तालुक्यातील प्रफुल्ल लोढा यांनी काल पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्यावर खळबळजनक आरोप केले होते. जिल्हाध्यक्ष अँड. रवींद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रफुल्ल लोढा हे स्वत:ला राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी म्हणवत असले तरी ते पक्षाचे साधे कार्यकर्ते सुध्दा नाहीत अशी माहिती त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
आहेत. काल जामनेरचे प्रफुल्ल लोढा यांनी पत्रकार परिषद घेऊन आमचे राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्यावर गंभीर आरोप केले. याबाबतचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध करतो. पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की, प्रफुल्ल लोढा हे स्वत:ला राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी म्हणवत असले तरी ते पक्षाचे साधे कार्यकर्ते सुध्दा नाहीत. असे त्यांनी खुलासा केला.तसेच रावेर तालुक्यातील सावदा येथे प्रफुल्ल लोढा यांच्या प्रतिमेचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला .सावद्याचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश नगराज पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत लोढा यांचा निषेध केला.