इमारत पूर्ण झाल्यावर गाव जेवण देणार : श्रीकांत खटोड यांची प्रतिक्रिया

जळगाव (प्रतिनिधी) : व्यावसायिक अजय ललवाणी यांचे आमच्याविरुद्ध केलेले आरोप बिनबुडाचे व वैयक्तीक द्वेषापोटी आहे. श्रीश्री इन्फ्रास्ट्रक्चर्स चे बांधकाम क्षेत्रात 30 वर्षापासुन नाव आहे. जर बेकायदेशीर असते तर ज्यां लोकांनी फ्लॅट विकत घेतले आहे ते यांचे बाजुने ऊभे राहीले असते. इतकेच काय तर नियमानुसार असल्याने फ्लॅट धारकांना सर्व बॅन्का कर्ज देत आहे. शिवाय फ्लॅट धारक आनंदात आहे. माझ्या दुसऱ्या प्लाॅटवर यांनी स्टेचा उल्लेख केला आहे. स्टे तर कोणालाही मिळतो आणी रद्दही होतो, असा प्रतिआरोप श्रीकांत खटोड यांनी केला आहे.
व्यवसायिक अजय ललवाणी यांच्यासह इतरांनी शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन श्रीकांत व श्रीराम खटोड यांनी मेहरुण शिवारात येणारी खुली जागा बळकावल्याचा आरोप केला आहे. त्या पार्श्वभूमीवर खटोड बंधू यांनी आरोप करीत यांचे म्हणणे खोडून काढले आहे.
कोणालाही न जिंकता आलेल्या किल्याप्रमाणे ही इमारत देखील अभेद्य अजिंक्य अशीच जंजिरा समान असुन पाण्याला लागुन असल्याने या इमारतीचे नाव “श्रीश्री जंजिरा” असे ठेवीत आहे. हे काहीही म्हणोत हि इमारत बांधली जाणार आणी विशेष म्हणजे वास्तुशांतीला गाव पंगत देणार. इतके नियमाकुल व मजबुत प्रकल्प या खुल्या जागेवरील आहे, असे खटोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.







