नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – ओडिशामध्ये पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गांजाच्या लागवडीचा भंडाफोड केला आहे. पोलिस व वनविभागाच्या संयुक्त कारवाईत राज्यातील गंजम जिल्ह्यात सुमारे 40 एकर जागेवर कॅनबीस (गांजा) ची झाडे नष्ट केली आहेत. जिल्हा उपअधीक्षक अभिराम बेहरा म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सुमारे 300 कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. बेहेरा म्हणाले की, दोन कोटी रुपयांचे ड्रग्ज नष्ट केली आहेत.

या व्यतिरिक्त त्या भागातील डीएसपी म्हणाले की, अशा प्रकारचे ऑपरेशन इतर ठिकाणीही केले जाईल. जिथे लोक बेकायदेशीरपणे भांग लागवड करत आहेत.
दरम्यान, सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणानंतर बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग प्रकरण उघडकीस आली. या प्रकरणात अनेक बड्या कलाकार आणि अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत. नुकताच कॉमेडियन भारती आणि तिच्या पतीला गांजाचे सेवन करण्याच्या आरोपाखाली अँटी नॉरोटिक्स सेलने अटक केली. याआधी ड्रग्सच्या बाबतीत स्टार्सवर चौकशी केली गेली होती.







