रावेर (प्रतिनिधी) – रावेर शहरातुन अवैध वाळू वाहतुक करणारे ट्रँक्टर-टॉली पोलिसांनी पकडले असून रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक संशयित आरोपी अटकेत देखिल आहे.
अवैध वाळूवर कारवाई धडाका सुरुच असून तब्बल २ लाख २८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रावेर शहरातील उटखेडा रोडवर जमजम अँक्वाँ सेटर समोर दुपारी (एमपी- 68 ,ए – 2566) स्वराज्य कंपनीचे निळ्या रंगाचे ट्रँक्टर तीन हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळु अवैध पध्दतीने वाहतुक करत असतांना रावेर पोलिसांनी पकडले रावेर पोलिसात भादवि कलम 379 व गौन खनिज कायदा कलम 48 प्रमाणे पो कॉ सुरेश मेढे यांच्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टॅक्टर-टॉली जप्त असून आरोपी अटकेत आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे व पो.ना. महेंद्र सुरवाडे हे करीत आहेत.








