• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कैलाश विजयवर्गीय यांनी इंदोरमध्ये एका जाहीर सभेत एक धक्कादायक खुलासा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 17, 2020
in भारत
0

भोपाळ (वृत्तसंस्था) – भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी इंदोरमध्ये एका जाहीर सभेत एक धक्कादायक खुलासा केलाय. ‘मार्च २०२० मध्ये कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार पाडण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती’ असं त्यांनी सभेत उपस्थितांसमोर म्हटलंय.
त्यामुळे, काँग्रेसकडे टीकेची थेट संधीच चालून आलीय.इंदोरमध्ये भाजपकडून आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी संमेलनाला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलंय.

‘तुम्ही कुणाला सांगू नका, मी आजपर्यंत ही गोष्ट कुणाला सांगितली नाही. पहिल्यांदाच या मंचावरून ही गोष्ट जाहीर करत आहे की कमलनाथ यांचं सरकार पाडण्यात जर कुणाची महत्त्वपूर्ण भूमिका होती तर ती नरेंद्र मोदी यांची होती, धर्मेंद्र प्रधान यांची नाही’ असं म्हणणाऱ्या कैलाश विजयवर्गीय यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
यावेळी, केंद्रीय पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅसमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा हेदेखील उपस्थित होते.

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं काँग्रेस सरकार पाडण्याचा निर्णय केलाय, असं जून महिन्यात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पक्ष कार्यकर्त्यांना कथिररित्या म्हटलं होतं.

मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलूजा यांनीदेखील विजयवर्गीय यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घटनात्मक पद्धतीनं निवडलेल्या सरकारला असंविधानिक पद्धतीनं पाडलं, हे आता स्पष्ट झालंय. काँग्रेसनं सुरुवातीपासूनच ही गोष्ट मांडलीय. भाजपकडून मात्र आत्तापर्यंत कमलनाथ सरकारला पाडण्यासाठी काँग्रेसचा अंतर्गत वाद जबाबदार असल्याचं कारण सांगितलं जात होतं. आता भाजप राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी स्वत:च ही गोष्ट स्पष्ट केलीय’, असं म्हणत सलूजा यांनी भाजप नेतृत्वावर टीका केलीय.

याच वर्षी मार्च महिन्यात करोना लॉकडाऊन सुरू होण्याआधीच ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या २२ साथीदारांसोबत (सहा मंत्र्यांचा समावेश) विधानसभा आणि कॉंग्रेसला राम राम ठोकत भाजपच्या गोटात सहभागी होण्याचा मार्ग स्वीकारला होता. बहुमत नसल्यानं मध्य प्रदेशात केवळ १५ महिन्यांत कमलनाथ सरकार कोसळलं होतं.


 

 

Previous Post

भारताला कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात खर्च १३२ अब्ज रुपये !

Next Post

भारतात निम्म्याहून अधिक वाहनांचा विमा नाही

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भारतात निम्म्याहून अधिक वाहनांचा विमा नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

८ वर्षांपूर्वी अपहृत झालेल्या मुलीचा ‘भोंगऱ्या’ बाजारात लागला शोध
1xbet russia

८ वर्षांपूर्वी अपहृत झालेल्या मुलीचा ‘भोंगऱ्या’ बाजारात लागला शोध

February 25, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली
जैन कंपनी

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली

February 25, 2026
जिल्हा परिषदेचा शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर
1xbet russia

जिल्हा परिषदेचा शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर

February 25, 2026
रिसेंट ट्रेन्डस इन एफपीजीए डिझाईन व अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट
1xbet russia

रिसेंट ट्रेन्डस इन एफपीजीए डिझाईन व अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट

February 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

८ वर्षांपूर्वी अपहृत झालेल्या मुलीचा ‘भोंगऱ्या’ बाजारात लागला शोध

८ वर्षांपूर्वी अपहृत झालेल्या मुलीचा ‘भोंगऱ्या’ बाजारात लागला शोध

February 25, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली

February 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon