• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

उद्यापासून ‘नॉन कोविड’ सुविधांना होणार प्रारंभ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 16, 2020
in जळगाव
0

जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नव्या रुपात सेवा देण्यास सज्ज

जळगाव (प्रतिनिधी) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे पूर्वीप्रमाणे कोरोनाव्यतिरिक्त (नॉन कोविड) इतर सेवा गुरुवार दि. १७ डिसेंबर पासून सुरु होणार आहेत. गेले सात महिने हे रुग्णालय हे कोरोना रुग्णांची अविरत सेवा करीत होते. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी व जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिजित राऊत यांनी बुधवारी १६ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे प्रशासक डॉ. बी.एन.पाटील व अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन एस चव्हाण, उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार हे उपस्थित होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव हे कोरोनाव्यतिरिक्त (नॉन कोविड) इतर सेवा सुरु करण्यासाठी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली १ डिसेंबरपासून सर्व डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी, परिचारिका परिश्रम घेत आहेत. त्याचाच भाग म्हणून आजचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव हे राज्यातील आदर्श रुग्णालय बनविण्याच्या दृष्टीने देखील वाटचाल सुरु आहे. गेल्या १६ दिवसांपासून महाविद्यालयातील विविध भागात नवनवीन बदल घडून येत आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा पूर्ण आढावा घेतल्यानंतर राज्याचे वैद्यकीय संचालक डॉ.तात्याराव लहाने यांच्याशी वेळोवेळी केलेल्या चर्चेनंतर जिल्हाधिकारी व प्रशासक यांच्याकडे प्रस्ताव दिला होता. त्याला मंजुरी मिळाल्या नंतर आता 17 डिसेंबर पासून नॉन कोविड सुविधा जिल्ह्यातील नागरिकांना सुरू होत आहेत.

होत असलेल्या बदलांवर एक दृष्टिक्षेप :-

१) वाहन पार्किंग : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयमधील डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी, परिचारिका यांच्यासह रुग्णालयात वैद्यकीय सेवा घेण्यासाठी येणारे नागरिक व रुग्णांचे नातेवाईक यांच्या वाहन पार्किंगचा प्रश्न सुटला असून मुख्य गेट क्रमांक २ मधून सर्व चारचाकी व दुचाकी वाहनांना प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे वाहन पार्किंगकरिता शिस्त लागली असून या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षारक्षक यंत्रणा देखील उभारली गेली आहे.

२) स्वच्छता : रुग्णालयाच्या व महाविद्यालयाच्या आवारात पूर्वी अस्वच्छता दिसून यायची. मात्र आता त्याबाबत काटेकोर धोरण ठेवून सर्व ठिकाणी साफसफाई करण्यात आली आहे. तसेच महत्वाच्या पॉईंटवर कचरापेट्या ठेवल्या आहे. व्यसने करून परिसर अस्वच्छ करण्याबाबत प्रतिबंध घातला जात असून प्रत्येकाला वैयक्तिक स्वच्छतेविषयी माहिती देण्यात आली आहे.

३) परिसर सुशोभीकरण : परिसरात सुशोभीकरणाला मोठे महत्व दिले जात असून मुख्य गेटच्या प्रवेशद्वारातून आत आल्यावर ऐतिहासिक निर्जंतुकीकरण मशीन लक्ष वेधून घेत आहे. तसेच परिसरातील विविध प्रकारची झाडे देखील न कापता त्याला विशिष्ट सजावट करून परिसर आकर्षक करण्याचा पूर्ण प्रयत्न केला जात आहे. याशिवाय भिंतीवर रंगकाम करून विविध प्रकारची भित्तिचित्रे काढून परिसर प्रसन्न करण्याचे काम हाती घेतले आहे.

४) रस्ते : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयचे दोन्ही प्रवेशद्वाराकडील रस्ते नव्याने दुरुस्त करण्यात आले आहे. तर मुख्य महाविद्यालयाकडे जाणारे रस्ते डांबरीकरण करून उत्तम झाले आहेत. त्यामुळे परिसरात ये-जा करण्यास सुलभता होत आहे.

५) भंगार : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात काही ठिकाणी अनावश्यक भंगार साहित्य पडून होते. त्याचा निपटारा करीत त्या जागा वैद्यकीय सेवेसाठी उपयोगात आणण्यात येत आहेत.

६ ) वैद्यकीय सुविधा : वैद्यकीय कर्मचारी वर्ग पुरेसा आहे. औषधींची कमतरता नाही. गंभीर रुग्णांसाठी व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. तसेच ऑक्सिजन टॅंकची उभारणी करण्यात आली आहे.

७) मर्यादित वाहनांना प्रवेश : येथील मुख्य गेट क्र. १ मधून फक्त रुग्णवाहिका, शववाहिका, पोलिसांचे वाहन, कचरा भरणारे वाहन यांनाच आतमध्ये सोडण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच काहींनी दुचाकी, रिक्षा किंवा खाजगी चारचाकीतुन रुग्ण उपचारास आणला असेल तर त्या वाहनांनाच आत सोडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

८) ओपीडीची सुलभ व्यवस्था : रुग्णांना वैद्यकीय सेवा तातडीने मिळावी, त्याचा वेळ वाचला पाहिजे या दृष्टीने मुख्य गेटच्या आवारातील वाहन पार्किंग काढून टाकीत तेथे केसपेपर देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे महिला, पुरुष, दिव्यांग यांच्यासाठी ४ टेबल राहतील. रुग्णाचा केसपेपर निघाला कि त्याच्या समोरील बाजूस वैद्यकीय सेवेसाठी तो आत जाईल. त्याला आवश्यक सेवा मिळाली कि तो लवकर घरी गेला पाहिजे अशा प्रकारचे व्यवस्थित नियोजन याठिकाणी डॉक्टर्स, परिचारिका, कक्षसेवक, कर्मचाऱ्यांचे करण्यात आले आहे.

९) संपर्कांसाठी यंत्रणा : रुग्णालयात सकाळी ९ ते १ वैद्यकीय सेवा राहील. केसपेपर काढण्याची वेळ सकाळी ८. ३० ते १२. ३० राहील. रुग्णांना संपर्कासाठी केसपेपरच्या बाजूला जनसंपर्क कक्ष उभारण्यात आला आहे.

१०) महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना : राज्यातील दारिद्रयरेषेखालील आणि दारिद्रयरेषेवरील कुटुंबांना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने महाराष्ट्र राज्य सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना सुरू केली आहे. अशा कुटुंबांना अधिक दर्जेदार वैद्यकीय सेवा प्राप्त होण्याच्या दृष्टीने ही योजना आहे. हि सुविधा मुख्य गेट क्र. १ च्या आवारातच करण्यात आली असून त्यासाठी रुग्णांनी रेशनकार्ड व आधारकार्ड आणणे गरजेचे असणार आहे.


 

 

Previous Post

अमळनेर तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतिंचा निवडणूक कार्यक्रम घोषित…

Next Post

शाळांतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नवीन आकृतिबंध मागे घ्यावा – प्रवीण जाधव

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शाळांतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नवीन आकृतिबंध मागे घ्यावा - प्रवीण जाधव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon