जळगाव (प्रतिनिधी) – पा. ता. सह. शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कुल पाचोरा येथील उपशिक्षक प्रदीप भगवान पाटील हे इंग्रजी विषयात 90.86 percentile मिळवून नेट परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांच्या या यशाने संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. प्रदीप पाटील हे सेवानिवृत्त सर्कल बी. एस. पाटील आप्पा यांचे चिरंजीव आहेत.
संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब दिलीप वाघ, चेअरमन मा. नानासाहेब संजय वाघ, व्हा. चेअरमन व्ही. टी. जोशी, मानद सचिव अँड. दादासाहेब महेश देशमुख, शालेय समिती चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभाग चेअरमन वासुदेव महाजन, संचालक मंडळ, पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापिका, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.