जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील अमिता सतिष निकम या एमईडी नांदेड रामतीर्थ विद्यापीठातुन ७७ टक्के मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत. त्या गुरुकुल शाळेत शिक्षिका असून कोरोना काळात अतिशय प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी वर्गांचे मोफत शिक्षण क्लासेस त्या घेत आहे. त्या अँचिव्हर्स द एज्युकेशन हबच्या संचालिका असून संस्कृत भाषेत त्यांनी प्रभुत्व मिळवले आहेत. त्या असित संस्कृत अकॅडमीच्या माध्यमातुन संस्कृत भाषेचा प्रसार प्रचार करित असतात. एमईडीच्या अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाचे डाँ. शेखर झुंझारवार, डॉ. घुले यांचे अनमोल मार्गदर्शन त्यांना मिळाले. डॉ.अमिता निकम या जळगावातील सामाजिक कार्यकर्ते असलेले सतिष निकम यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्व शैक्षणिक क्षेत्रातुन त्यांचे कौतुक होत आहे.








