वडती ता. चोपडा (प्रतिनिधी) – नवीन कृषी कायदे म्हणजे चांगले लेबल लाऊन जुने सावकारी कायदे लागू करणे व कोर्टात दाद देखील मागायला परवानगी नाही हा हेतू शुध्द कसा…
…आज देशभरातील शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदचे समर्थनार्थ गलांगी तालुका चोपडा येथे चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी रास्ता रोको करून व संपूर्ण बंद पाळून समर्थन दिले.यावेळी शेतकरी कृती समितीचे समन्वयक एस बी पाटील यांनी नवीन कायदे शेतकऱ्यांना पेक्षा व्यापारी व कार्पोरेटला कसे फायद्याचे सांगून आज जिल्ह्यात किमान आधारभूत किंमत ठरत नसलेले केळी, भाजीपाला यासारखे पीक मातीमोल भावाने शेतकरी बाजारात विकत आहे म्हणजे त्यांचा उत्पादन खर्च ठरवून त्या पिकांना देखील हमी भाव मिळणे गरजेचे असताना, ज्यांची किंमत ठरते ते देखील पडलेल्या भावात विकणेसाठी कार्पोरेट ला पाहिजे तेवढा साठा करायचा अधिकार मात्र शेतकऱ्यांना भाव दिल्यास ईडीचे धाडी टाकायचे प्रावधान व कोर्टात जायला बंदी हे हुकुमशाही चे द्योतक असल्याचे सांगितले.

यावेळी अनेर संघर्ष समितीचे प्रदीप पाटील,भ्रष्ट्राचार निर्मूलनचे किशोर दुसाने,संभाजी ब्रिगेडचे मयुर पाटील, एनएसयुआयचे चेतन बाविस्कर यांनी आपले विचार मांडलेत. आंदोलनात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील,सनी सचदेव, राहुल पाटील, चोसांकाचे व्हा. चेअरमन शशी देवरे, संचालक प्रदीप पाटील, शेतकी संघचे माजी चेअरमन सदाशिव पाटील, अरुण बोरसे, युवा संघाचे दिव्यांक सावंत व सहकारी, तसेच कुलदीप पाटील, सोमनाथ देवराज, सुनील कोळी, रंगराव पाटील, बबलू करंदीकर, नितीन सोनवणे यांचेसह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.







