नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – केंद्र सरकारच्या कृषी विधेयकावरून शेतकऱ्यांचे दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर गेल्या 12 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी शेतकरी आणि विरोधक रस्त्यावर उतरले असून, आज ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली आहे. त्या बंदमध्ये सहभाग होण्यासाठी जाणाऱ्या भीम आर्मीचे चीफ चंद्रशेखर रावण यांना उत्तर प्रदेश पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. युपी पोलीसांनी राष्ट्रीय लोक दल नेता इंदरजीत सिंह यांना सुद्धा गाजियाबादेतून ताब्यात घेतले आहे. हे सगळे शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीकडे जात होते.

वाराणसीत भारत बंदला प्रतिसाथ देण्यासाठी समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते रविंद्रपुरीच्या नाराम बाबा आश्रमापासून लंकापर्यंत यात्रा काढत होते. मात्र त्यांना सुद्धा पोलीसांनी ही यात्रा काढू दिली नाही. दरम्यान, आज केंद्र सरकारच्या विरोधात शेतकरी आणि विरोधी पक्षांनी भारत बंद नारा दिला आहे. यात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, महाराष्ट्रासह आणखी राज्यातील शेतकऱ्यांनी बंदची हाक दिली आहे.







