जळगाव (प्रतिनिधी) – नशिराबाद येथे मनियार बिरादरीतर्फे आज दि. ६ डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद लाभला असून यातून ४१ बाटल्या रक्त संकलीत करण्यात आले.
राज्यातील सर्व रक्त पेढी मध्ये रक्ताचा होत असलेला तुटवडा व त्यात कोरोना चा प्रादुर्भाव म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजिक संघटनांना रक्त दाना विषयी आव्हान केले असता जळगाव जिल्हा मानियार बिरदारीने त्यास प्रतिसाद देत नशिराबाद येथे रक्त दान शिबिराचे आयोजन करून डॉ उल्हास मेडिकल कॉलेज रक्तपेढीला ४१ बॅगेचे संकलन करून देण्यात आले.
जळगाव येथील फिजिशियन तज्ञ डॉक्टर पंडित यांच्या शुभहस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे गफ्फार मलिक होते तर प्रमुख अतिथी म्हणून आरोग्य पर्वेक्षिका खैरून उन्निसा शेख, नशिराबादचे माजी सरपंच पंकज महाजन, ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र पाटील, विनोद रंधे, चंदू पाटील, जळगाव जिल्हाध्यक्ष मझर खान,उपाध्यक्ष नशिराबादचे बरकत अली, भुसावळ चे सरचिटणीस इम्तियाज शेख,नशिराबाद चे अय्युब मेंबर,रियाझ मानियार,इस्माईल मानियार व मोहम्मद रईस सैयद यांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम रक्तपेढीचे डॉक्टर सईद शेख यांनी कुराण पठण केले व रक्तदानस सुरुवात करण्यात आली. सहा डिसेंबर हा संपूर्ण भारतात महा परिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच या ६ डिसेंबर रोजी बाबरी मस्जिद ला शहीद करण्यात आले होते. या दोघा क्षणाचे औचित्य साधून त्यांना अभिवादन करण्यासाठी आज या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजक मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी आपल्या प्रास्ताविकात द्वारे स्पष्ट केले.