जळगाव (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयात शिकविल्या जाणाऱ्या बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बी.व्होक (सर्वविषय), बी.ए.(एम.सी.जे.), बी.एस.डब्ल्यू. आणि विद्यापीठ प्रशाळांतील बी.एस्सी.(ॲक्च्युरियल सायन्स), एम.ए., एम.एस्सी., एम.सी.ए., एम.बी.ए., एम.ए.(एम.सी.जे.), एम.एस.डब्ल्यू., बी.टेक., एम.टेक. या अभ्यासक्रमांच्या माहे डिसेंबर, २०२० मध्ये होणाऱ्या परीक्षांचे, परीक्षा अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांकरीता ६ डिसेंबर पर्यंत आणि रु.५० विलंब शुल्कासह ८ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महाविद्यालयांनी विलंब शुल्क विरहीत परीक्षा अर्ज ७ डिसेंबर पर्यंत ऑनलाईन इनवर्ड करावयाचे आहेत. तर विलंब शुल्कासह विद्यार्थ्यांनी भरलेले परीक्षा अर्ज विद्यापीठास ९ डिसेंबर पर्यंत सादर करावयाचे आहेत. हे परिपत्रक विद्यापीठ संकेतस्थळावर (www.nmu.ac.in) प्रसिध्द करण्यात आले आहे.
उमवित जागतिक दिव्यांग दिन साजरा
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव पसरु नये याकरीता विद्यार्थ्यांनी शक्यतो ऑनलाईन परीक्षा अर्ज व शुल्क भरावेत आणि महाविद्यालयांनी कोरोना संदर्भात आवश्यक त्या उपाययोजना करुन परीक्षा अर्जांबाबतची कार्यवाही करावी असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांनी केले.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आज ३ डिसेंबर रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रुसा समावेशी शिक्षण संसाधन केंद्रात कुलगुरु प्रा.पी.पी. पाटील यांच्या हस्ते लुईस ब्रेल आणि हेलन केलर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार, ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ.अनिल चिकाटे, समन्वयक डॉ.राम भावसार व केंद्रातील कर्मचारी दिव्या बोरसे व मयूर पाटील उपस्थित होते.