• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पंधरा दिवसात पडणार ममता बॅनर्जी सरकार – सौमित्र खान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 30, 2020
in भारत
0

कोलकाता (वृत्तसंस्था) – पुढील वर्षी होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तयारी आतापासूनच सुरुवात झाली असून पश्चिम बंगालमध्ये सध्या फोडाफोडीच्या आणि पक्षांतराच्या राजकारणाला जोर आला आहे. राज्यात गेल्या दहा वर्षांपासून सत्तेवर असलेल्या ममत बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला फुटीचे ग्रहण लागले असून, पक्षाला काही बड्या नेत्यांसह अनेक आमदार सोडचिठ्ठी देत आहेत.

त्यातच आता ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारबाबतही अनेक दावे केले जात आहेत. आमच्या संपर्कात तृणमूल काँग्रेसचे ६२ आमदार असून, ममता सरकार येत्या १५ डिसेंबरपर्यंत पडणार असल्याचा दावा भाजपाचे खासदार सौमित्र खान यांनी केला आहे.

सौमित्र खान म्हणाले की, आमच्या संपर्कात तृणमूल काँग्रेसचे ६२ आमदार असून ते कधीही पक्ष बदलू शकतात. १५ डिसेंबरपर्यंत आम्ही तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पाडणार आहोत. ममता बॅनर्जी यांना अशा परिस्थितीत सरकार चालवणे कठीण जाणार आहे. दरम्यान, सध्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडे स्पष्ट बहुमत आहे.

कालही ममता बॅनर्जी सरकार अस्थिर झाल्याचा दावा सौमित्र खान यांनी केला होता. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना राज्याच्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपाल जगदीप धनखड हे देऊ शकतात, असा दावा केला होता.

ममता बॅनर्जी सरकारमधील बलाढ्य मंत्री शुभेंदू अधिकारी यांनी काही दिवसांपूर्वी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यापासून ममता सरकार अस्थिर झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. आता तृणमुल काँग्रेस सोडून शुभेंदू अधिकारी हे भाजपमध्ये दाखल होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेससाठी हा मोठा धक्का ठरू शकतो. शुभेंदू अधिकारी हे मिदनापूरमधील बलाढ्य नेते आहेत. तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये त्यांचा चांगला प्रभाव आहे.

दरम्यान, तृणमूलचे ६२ आमदार आपल्या संपर्कात असल्याचा भाजपने दावा करून पश्चिम बंगालमधील वातावरण तापवले आहे. पण तृणमूलच्या संपर्कात भाजपचेच तीन ते चार खासदार आणि काही नेते असल्याचा दावा करून तृणमूल काँग्रेसने भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. पण यावर अद्याप भाजपकडून प्रतिक्रिया जाहीर करण्यात आलेली नाही.


 

 

Previous Post

योगी सरकारला या निर्णयाबद्दल पुनर्विचार करावा – मायावती

Next Post

जिल्‍हा सामान्य रुग्णालयामध्ये नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्याला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्‍हा सामान्य रुग्णालयामध्ये नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्याला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
मुक्ताईनगरात ट्रकमधून ३४० लिटर डिझेल चोरी; ३४ हजारांचे नुकसान
Uncategorized

मुक्ताईनगरात ट्रकमधून ३४० लिटर डिझेल चोरी; ३४ हजारांचे नुकसान

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon