• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ही निवडणूक हैदराबादची निवडणूक असल्यासारखे वाटत नाही – ओवेसी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 29, 2020
in भारत
0

हैदराबाद (वृत्तसंस्था) – भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने प्रचारात लक्ष घातल्याने ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेची निवडणूक चर्चेत आली आहे. भाजपाकडून या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह यांनी हैदराबादमध्ये जाऊन प्रचार केला आहे. दरम्यान, या प्रचारावरून एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपाला टोला लगावला आहे. शनिवारी लांगर हाऊस येथे झालेल्या रॅलीमध्ये ओवेसी म्हणाले की, ही निवडणूक हैदराबादची निवडणूक असल्यासारखे वाटत नाही आहे. असे वाटतेय की नरेंद्र मोदींच्या जागी पंतप्रधानपदाची निवडणूक होत आहे. मी एका सभेत असताना म्हटलं की, इथे त्यांनी सर्वांना बोलावले. तेव्हा एक मुलगा म्हणाला की, आता त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाही बोलावले पाहिजे. त्याचं म्हणणं बरोबर आहे. आता केवळ डोनाल्ड ट्रम्पच उरले आहेत. यापूर्वीही ओवेसींनी भाजपावर टीका केली होती. १ डिसेंबर रोजी जनता डेमोक्रॅटिक स्ट्राइक करेल, असा टोला लगावला होता.

शनिवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हैदराबादमध्ये आले होते. त्यांनी इथे रोड शो केला. तसेच संध्याकाळी एका सभेला संबोधित केले होते. तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी शुक्रवारी हैदराबादमध्ये रोड शो केला होता. या अभियानादरम्यान, आदित्यनाथ यांनी सांगितले की, काही लोक त्यांना विचारतात की, हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर केले पाहिजे का, यावर मी सांगितलं की, का नाही. एवढेच नव्हे तर आदित्यनाथ यांनी यावेळी प्रयागराजचे उदाहरणही दिले.

दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी भाजपावर टीका केली होती. काही फुटीरतावादी शक्ती शांतता भंग करण्यासाठी शहरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण त्यांना असे करू देणार का, आपण आपली शांतता भंग गमावणार आहोत का, मी हैदराबादच्या जनतेला आवाहन करतो की, तुम्ही पुढे या आणि टीआरएसला पाठिंबा द्या. हैदराबादला या फुटीरतावादी शक्तींपासून वाचवा, असे आवाहन, चंद्रशेखर राव यांनी केले होते.


 

 

Previous Post

नवीन कृषी कायद्यामुळे शेतकर्‍यांना नवीन मार्ग मिळाला आहे – पंतप्रधान

Next Post

अश्लिल मॅसेज व व्हिडीओ पाठविणाऱ्या संशयिताला जळगावातून अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अश्लिल मॅसेज व व्हिडीओ पाठविणाऱ्या संशयिताला जळगावातून अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव क्रिकेट लिग ची रविवारी ‘ग्रॅण्ड फायनल’
जैन कंपनी

जळगाव क्रिकेट लिग ची रविवारी ‘ग्रॅण्ड फायनल’

April 25, 2026
लग्नाच्या हळदीत ‘बँड’चे वाहन पुढे घेतल्याच्या वादातून वृद्धाला बेदम मारहाण
1xbet russia

लग्नाच्या हळदीत ‘बँड’चे वाहन पुढे घेतल्याच्या वादातून वृद्धाला बेदम मारहाण

April 25, 2026
वीट चोरीचा संशय घेतल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला
1xbet russia

वीट चोरीचा संशय घेतल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला

April 25, 2026
कापूस शेतीतील महिलांच्या आरोग्य व पोषणासाठी जळगाव जिल्ह्यात ‘वात्सल्य प्लस’ उपक्रम कार्यान्वित
Uncategorized

कापूस शेतीतील महिलांच्या आरोग्य व पोषणासाठी जळगाव जिल्ह्यात ‘वात्सल्य प्लस’ उपक्रम कार्यान्वित

April 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव क्रिकेट लिग ची रविवारी ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची रविवारी ‘ग्रॅण्ड फायनल’

April 25, 2026
लग्नाच्या हळदीत ‘बँड’चे वाहन पुढे घेतल्याच्या वादातून वृद्धाला बेदम मारहाण

लग्नाच्या हळदीत ‘बँड’चे वाहन पुढे घेतल्याच्या वादातून वृद्धाला बेदम मारहाण

April 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon