पणजी : राज्यात कोरोनाने थैमान घातल्यानंतर आता गोव्यामध्ये कोरोनाची एन्ट्री झाली आहे . गोव्यामध्ये करोनाचे पहिले रुग्ण आढळून आले आहेत. स्पेन, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेमध्ये प्रवास करुन आलेल्या कोरोनाचा झाल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.
गोव्यामध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्याची ही पहिलीच घटना आहे. तीन पुरुषांना कोरोनाची लागण झाली आहे. एकाचे वय २५, दुसऱ्याचे २९ तर तिसऱ्याचे ५५ वर्षे आहे, असेही आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान, गोव्यात एन्ट्री झाल्याने आता राज्य सरकारच्या चिंतेत वाढ झाली आहे.