पारोळा(प्रतिनिधी) – अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष प्रदीप खंडारपूरकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव पाटील आणि जिल्हाध्यक्ष महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशाने पारोळा,एरंडोल, धरणगाव या विभागाच्या विभागीय अध्यक्षपदी जितेंद्र महादू वानखेडे यांची नियुक्ती करण्यात आली.

जितेंद्र वानखेडे यांची सामाजिक कामगिरी पाहता आणि जनसामान्यांची सेवा करण्याची कामगिरी बघता वरील विभागीय अध्यक्षपदी वानखेडे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हाध्यक्ष पाटील यांनी सांगीतले. तालुक्यातील तसेच विभागातील सर्व सामान्य माणसांचे प्रश्न व अडीअडचणी संघटनेच्या माध्यमातून सोडण्यास मदत होणार असल्याचे पाटील म्हणाले.







