बंगळुरू : कर्नाटकात बुधवारी एका दिवसात कोरोना बाधितांची संख्या 10 ने वाढली. त्यामुळे बाधितांची संख्या 51 वर पोहोचली. या दहा जणांमध्ये आपल्या वडिलांकडूनच बाधा झालेल्या सात आणि नऊ वर्षांच्या मुलींचा समावेश आहे.
एक 34 वर्षीय व्यक्ती 19 मार्च रोजी ऍमस्टरडॅमहून परत आले. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. ते कोरोनाचे कर्नाटकातील 17 चे बाधित आहे. त्यांचे कुटुंब त्यांच्या घरात विलगीकरण करून ठेवण्यात आले होते. मात्र त्यांच्या मुलींना ताप आला. त्यांची चाचणी केली असता त्यांना बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र अद्याप त्यांच्या आईची चाचणी निगेटिव्ह आली आहे.
दरम्यान गौरीबिदनुरू येथील एक 70 वर्षीय महिला घरी विलगीकरणात ठेवण्यात आली होती. त्यांचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली होती, असे समजते. मात्र त्याबाबत आरोग्य खात्याचे अधिकारी बोलावयास तयार नाहीत.
आज सपाडलेल्या नव्या बाधितांमध्ये चार ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत दाखल केलेल्या रुग्णांपैकी तीन जण पूर्णत: बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तर अन्य 47 जणांची प्रकृती स्थीर आहे.