• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मध्य रेल्वेचे आर्थिक वर्षात 145 रॅक्स मालवाहतूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 25, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – मध्य रेल्वेने या आर्थिक वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत १४५ रॅक्स ऑटोमोबाईल लोड केल्या आहेत. मागील संपूर्ण आर्थिक वर्षात ते ११८ रॅक लोड केले होते. भारतीय रेल्वेच्या ऑटोमोबाईल ट्रान्सपोर्ट वॅगन्सवर त्वरित आणि किफायतशीर वितरण करण्यासाठी महिंद्रा आणि महिंद्रा, टाटांचे ऑटोमोबाईल मध्य रेल्वेला मिळत आहेत.

मध्य रेल्वेने या आर्थिक वर्षात म्हणजे एप्रिल ते नोव्हेंबर २०२० पर्यंत कार, ट्रॅक्टर, पिकअप व्हॅन, जीप इत्यादी १४५ रॅक्समधून भारतातील विविध शहरांमध्ये वाहतूक केली आणि बांगलादेशला निर्यातसुद्धा रेल्वेने केली आहे. या आर्थिक वर्षांत १९ नोव्हेंबर २०२० पर्यंत मध्य रेल्वेतील भुसावळ विभागातून ८० रॅक्स, पुणे विभागातून ५३ रॅक्स, नागपूर विभागातून ९ रॅक्स व मुंबई विभागातून ३ रॅक्स मोटारींची वाहतूक केली आहे. या आर्थिक वर्षात सन २०२० -२०२१ मध्ये ८ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत १४५ रॅक्समध्ये मोटारींची वाहतूक करण्यात आली. जी मागील आर्थिक वर्षात म्हणजेच २०१९ -२०२० मध्ये ११८ रॅकची वाहतूक केली होती. हा व्यवसाय वाढवण्यासाठी मध्य रेल्वेचे मुख्यालय व विभागीय स्तरावरील बिझिनेस डेव्हलपमेंट युनिटने सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे महासंचालक संजीव मित्तल यांनी कौतुक केले.

एप्रिल ते नोव्हेंबर २०२० या आर्थिक वर्षात, ऐतिहासिक पाऊल म्हणून मुंबई विभागातून प्रथमच ८७ पिकअप व्हॅनने भरलेल्या २३ एनएमजी वॅगनचे रॅक कळंबोली ते बेनापोल, बांगलादेश येथे पाठविण्यात आले आणि त्यानंतर महिंद्राचे ८३ पिकअप व्हॅनने भरलेले दुसरे रेक दि. २० नोव्हेंबर २०२० रोजी २५ एनएमजी वॅगन्समधून बेनापोल, बांगलादेश मध्ये पाठविण्यात आले. दि. ३१.८.२०२० रोजी नव्याने सुरु केलेल्या अजनी गुड शेडमधून फिरोजपूरमध्ये पाठविण्यासाठी ट्रॅक्टर लोड केले गेले. बांगलादेशात ऑटोमोबाईल्सची निर्यात म्हणून, ट्रॅक्टरचा पहिला रॅक दि. १३.१०.२०२० ला अजनी गुड शेड येथून बांगलादेशच्या बेनापोलकरिता भरला गेला. ऑटोमोबाईल (एनएमजी) ची एक रेक चिंचवड गुडशेडमधून एर्नाकुलम येथे ९ वर्षांनंतर लोड केली गेली (याआधीची रेक वर्ष २०११ मध्ये लोड केली गेली). ट्रान्सपोर्ट कार्पोरेशन आफ इंडियाने (टीसीआय) ७५ पिकअप व्हॅन असलेली २५ एनएमजी रॅक मध्य रेल्वेच्या चिंचवड ते बेनापोल, बांगलादेश येथे प्रथमच लोडींग करून पाठविली आहे.

भुसावळ विभागाने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत ८० रेक लोड केले आहेत. देशांतर्गत रेल्वे वाहतूक सेवा बरीच लोकप्रिय झाली आहे. मेसर्स महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड नाशिकने काळैकोंडा, चित्तपूर, रक्सौल या नवीन ठिकाणी लोडींग करून रवाना केली आहे.

भारतीय रेल्वेने घेतलेल्या सुलभ मालवाहतुकीसाठी अनेक उपाययोजना आणि मध्य रेल्वेच्या पाचही विभागांत स्थापन केलेल्या व्यवसाय विकास युनिट (बीडीयू) च्या विशेष विपणन प्रयत्नांमुळे ऑटोमोबाईल लोडिंगची गती वाढली आहे. बीडीयूची सक्रिय भूमिका रेल्वेला नवीन व्यवसाय देणा-या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यास सक्षम करते. यामध्ये एनएमजी रॅक्सच्या फेऱ्यामधील वेळेवर बारीक नजर ठेवणे आवश्यक आहे जेणेकरुन मालाच्या पुन्हा वाहतुकीस रेक उपलब्ध होईल. त्यायोगे नवीन संधी आकर्षित होतील. लवकरच एनएमजी रॅकमध्ये ऑटोमोबाईल्स (महिंद्रा अँड महिंद्रा) जीप व ट्रॅक्टर कळंबोली (केएलएमजी) ते बांगलादेश येथे वाहतूक करण्यास दाखल होतील. मध्य रेल्वेने बुटीबोरी येथून एनएमजी लोडिंग वाढविणे, बारामती येथून ऑटोमोबाईल लोडिंग सुरू करणे आणि ऑटोमोबाईल वाहतुकीचे लोडिंग / अनलोडिंग यासाठी लोणी विकसित करण्याची योजना आखली आहे. मध्य रेल्वेने सर्व प्रकारच्या मदतीसाठी वाहन कंपन्या, लॉजिस्टिक कंपन्या आणि लोडर्सचा विस्तार केला आहे आणि त्यांच्या सर्व समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी मध्य रेल्वे वचनबद्ध आहे.


 

 

Previous Post

जिल्ह्यात ५७ नव्या रुग्णांची नोंद, तर एका रुग्णांचा मृत्यू

Next Post

ईडीच्या लोकांचं माझी पत्नी, मुलं आणि सुनांनी चांगलं स्वागत केले – प्रताप सरनाईक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ईडीच्या लोकांचं माझी पत्नी, मुलं आणि सुनांनी चांगलं स्वागत केले - प्रताप सरनाईक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महामार्गांवर प्रवाशांना लुटणाऱ्या तिघांना अटक ; दुचाकीसह मुद्देमाल जप्त
Uncategorized

महामार्गांवर प्रवाशांना लुटणाऱ्या तिघांना अटक ; दुचाकीसह मुद्देमाल जप्त

February 21, 2026
अवघ्या १२ तासांत २ वाईन शॉप फोडणारा सराईत चोरटा गजाआड
1xbet russia

अवघ्या १२ तासांत २ वाईन शॉप फोडणारा सराईत चोरटा गजाआड

February 21, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात मूलतत्त्व विषयक कार्यशाळा
1xbet russia

माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त विविध उपक्रम

February 21, 2026
तेजस्विता २०२६ उत्साहात प्रारंभ!
1xbet russia

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयाचा उपक्रम

February 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महामार्गांवर प्रवाशांना लुटणाऱ्या तिघांना अटक ; दुचाकीसह मुद्देमाल जप्त

महामार्गांवर प्रवाशांना लुटणाऱ्या तिघांना अटक ; दुचाकीसह मुद्देमाल जप्त

February 21, 2026
अवघ्या १२ तासांत २ वाईन शॉप फोडणारा सराईत चोरटा गजाआड

अवघ्या १२ तासांत २ वाईन शॉप फोडणारा सराईत चोरटा गजाआड

February 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon