अमळनेर (प्रतिनिधी) – अमळनेर येथे काँग्रेसचे जेष्ठ नेते आ.डाॅ.सुधीर तांबे (आमदार, विधानपरिषद महाराष्ट्र) आले असता जळगाव जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर विधानसभा युवक काँग्रेसच्यावतीने स्वागत करण्यात आला होता.
या समारंभात आमदार तांबे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या कामांसाठी पाठीवर कौतुकाची थाप मारून विविध विषयांवर मार्गदर्शन केले. तदनंतर अमळनेर युवक काँग्रेसच्या नविन पदनियुक्त्या करण्यात आल्या यावेळी नविन पदाधिकाऱ्यांचे नियुक्तीपत्रे आमदार तांबे यांच्याहस्ते वितरित करण्यात आले. तसेच काँग्रेस पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या शेतकरी विरोधी कायद्यांविरोधातील स्वाक्षरी मोहीमेत उत्तम कामगिरी बजावणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जळगाव जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष कृषिभुषण सुरेश पाटील,जळगाव जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा सुलोचना वाघ, अमळनेर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे,प्रभारी तालुकाध्यक्ष बी.के.सुर्यवंशी,जळगाव जिल्हा युवक काँग्रेसचे सचिव हर्षल जाधव,किसान काँग्रेस अध्यक्ष सुभाष पाटील,अमळनेर तालुका सरचिटणीस संतोष बाबूराव पाटील,प्रा.शाम पवार,डॉ रविंद्र पाटील,माजी शहराध्यक्ष सईद तेली,अहमद पठाण, राजु शेख,अमळनेर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश दगडु पाटील, शहराध्यक्ष तौसिफ तेली,काँग्रेस अल्पसंख्याक सेल शहराध्यक्ष जुबेर पठाण,माजी शहराध्यक्ष अब्दुल कादीर,कुणाल चौधरी,इद्रिस बागवान,घनश्याम महाजन,महावीर जैन,राजु शेख,अजहर सय्यद,सलीम शेख,मझर सय्यद,मोइन शेख,समीर शेख,रऊफ पठाण,इम्रान अरब, जाहीद शेख,गणेश पाटील,मयुर पाटील,अक्षय चव्हाण,शुभम खंबायतकर,स्वप्नील पवार,गिरीश पाटील,प्रियाल पाटील,अतुल भागवत,हर्षल पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







