जळगाव (प्रतिनिधी) – राकेश सपकाळे खून प्रकरणातील फरार आरोपी आकाश मुरलीधर सपकाळे याला एलसीबीच्या पथकाने पाळधी येथून शिताफीने अटक करण्यात आली आहे. त्याला पुढील चौकशीसाठी शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

शहरात शिवाजीनगर परिसरामध्ये 4 नोव्हेंबर रोजी माजी महापौर अशोक सपकाळे यांचे पुत्र राकेश अशोक सपकाळे यांचा पाच संशयित आरोपींनी धारदार शस्त्राने वार करून खून केला होता. या प्रकरणात चार संशयित आरोपींना अटक झाली असून आकाश सपकाळे हा संशयित फरार होता. एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या माहितीवरून विजयसिंह पाटील, जितेंद्र पाटील, राहुल पाटील, प्रीतम पाटील, नितीन बाविस्कर यांनी पाळधी गावात सापळा रचला आणि धरणगाव तालुक्यातील पाळधी येथून आकाश सपकाळे याला ताब्यात घेतले पुढील चौकशीसाठी त्याला शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात घेण्यात आले आहे.







