पारोळा (प्रतिनिधी) – पारोळा तालुक्यातील दबापिंप्री येथील जि.प. शाळेच्या शेजारील दामू धोंडु सकट यांच्या झोपडीला दि. 11 नोव्हेंबर रोजी पहाटे तीन वाजता चिमणीच्या भडक्याने आग लागली.
त्यात संसारोपयोगी साहित्य, धान्य, कपडे दिवाळीसाठी कष्टाने कमावलेले 9 हजार रूपये जळुन राख झाले होते. या आपत्तीने सकट कुटुंबीय उघड्यावर आले. या कुटुंबीयांच्या मदतीसाठी अमळनेर विधानसभा युवक काँग्रेसने देखिल पुढाकार घेऊन पिडीत कुटुंबीयांना एका महिन्याच्या किराण्यासह दिवाळीनिमित्त फराळ व कपडे देऊन एक सामाजिक सलोखा जपण्याचा छोटेखाणी प्रयत्न केला. जळगाव जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश दगडु पाटील, शहराध्यक्ष तौसिफ तेली, शहरकार्याध्यक्ष कुणाल चौधरी, शहर उपाध्यक्ष इद्रिस बागवान , सरचिटणीस अतुल भागवत, मनिष पाटील, कुणाल पाटील, घनश्याम महाजन आदींनी मिळुन हि मदत पोहच केली .








