जळगाव (प्रतिनिधी) – शिक्षण हे विद्यार्थी केंद्रित आहे असे असतांना विद्यार्थ्यांना, पालकांना विचारात न घेता त्यांच्याशी निगडीत निर्णय, शासन घेऊ शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी २३ नोव्हेंबर पासून शाळा सुरु करण्याचे आदेश दिले. व १० नोव्हेंबरला शासनाने आदेश काढून अनेक-अनेक अटी शर्ती टाकून पालकांच्या लेखी संमतीनेच मुलांना शाळेत प्रवेश, ४ पेक्षा जास्त मुले एकत्रित नको, शाळेबाहेर पोलीस किंवा समांतर व्यवस्था उभारा, अशा जबाबदाऱ्या मुख्याध्यापकांवर टाकल्या. खर तर आपण पालकांच्या, शिक्षकपालक संघाच्या लेखी सूचना मागवायला हव्या होत्या. प्रत्यक्षात त्यांची लेखी संमतीला तयारी नाही. अश्या आशयाचे निवेदन भाजपा शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष प्रवीण जाधव यांनी शिक्षण सचिवांना दिले.
शाळांतील खोल्यांचे तापमान २४ ते ३० डिग्री पर्यंत ठेवा. आता हे वातानुकुलीत कसे शक्य आहे बर. अटी शर्ती नंतर शाळेत येणाऱ्या मुलांना केवळ गणित, विज्ञान, इंग्रजी हेच विषय शिकवा बाकी ऑनलाईन सुरु आहे तशीच शाळा असेल. स्वतः मुख्यमंत्री म्हणत आहे की जानेवारीत पुन्हा कोविड लाट येण्याची शक्यता. आताही नाशकात रुग्ण वाढलेच आहे. सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर वर्गाच्या आर.टी.पि.सी.आर. चाचण्या घेण्याची अंबलबजावणी झाली पाहिजे. मागे सुद्धा असे पत्र आले पण केवळ ते पत्रच राहिले. थर्मामीटर, ऑक्सिमीटर, इन्फ्रारेड डिजिटल थर्मोमीटर व गोळ्या स्थानिक प्रशासनाने उपलब्ध करून द्यायच्या आहेत. हे सर्व वेळेत होणार आहेत का? की केवळ मिशन बिगिनिंग मुळे काहीतरी करायचे म्हणून. मंदिर खुली करा, बाजारपेठ खुल्या करा यासाठी मोठ्या मागण्या होत्या. विद्यार्थ्यांच्या पालकांच्या ह्या मागण्या नाहीत कारण हे ऑनलाईन सुरूच आहे. आपण ही सुरुवात केल्यावर पण ७०% ऑनलाईनच शिक्षण द्यायचे आहे पालकांना मुलांची सर्वात जास्त काळजी वाटते म्हणून त्यांच्या प्रतिक्रिया अश्या आहेत की आम्ही लेखी का द्यावे? शासनच आमचे पालक आहे, त्यांनीच आमच्या मुलांची जबाबदारी घ्यावी – अन्यथा शाळा सुरु करण्याची घाई नको. सदर निर्णयावरील सुरु असलेली कार्यवाही त्वरित थांबवावी. असे निवेदन एन.आर.दाणी, विजय गिरणारे, हेमंत सोनार पांडुरंग पवार, विजयसिंग पाटील, संजय वानखेडे यांनी दिले आहे.