जामनेर तालुक्यातील वाघारी येथे व्यापारी बाप-लेकाचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे शोककळा

जामनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील नेरी येथिल हॉटेल पायल गार्डनसमोर भीषण अपघातात वडिल आणि मुलगा ट्रकच्या मागच्या चाकात येउन दोघं जागीच मृत्यू झाल्याची दुःखद घटना मंगळवारी १७ नोव्हेंबर रोजी सकाळी घडली आहे. दोघांचे शव ग्रामीण रुग्णालय जामनेर येथे शवविच्छेदनसाठी नेण्यात आले आहे.

जळगाव ते औरंगाबाद महामार्गावरील नेरी गावचा आज मंगळवार रोजी ढोर बाजार असल्याकारणाने अनेक व्यापारी येथे येतात. त्यानुसार जामनेर तालुक्यातील वाघरी गावचे व्यापारी असलेले बापलेक शेख रशीद शेख कालू (वय ६५) व त्यांचा मुलगा शेख आबिद शेख रशीद (वय २५) हे नेरी येथे दुचाकी क्रमांक एम एच १९ डी. एल. ४४६५ ने जात होते तर ट्रक क्रमांक जी.जे. १५ यु.यु.१७२६ हा पहूर कडून जळगावकडे जात होता. त्यावेळेला नेरी गावाच्या जवळ हॉटेल पायल गार्डनजवळ ट्रकच्या मागच्या चाकात येऊन दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात दोघेही पिता-पुत्रांचा चाक डोक्यावरून गेल्यामुळे जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली होती. यावेळी रुग्णवाहिकेला फोन करून जामनेर ग्रामीण रुग्णालयात नागरिकांनी दाखल केले. यावेळी जीएम फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी देखील मदत कार्य केले. जामनेर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून घटनेची माहिती घेण्याचे काम ते करीत आहेत. रशिद यांना त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले व तीन मुली आहेत

रुग्णालयात माजी मंत्री गिरीश महाजन यांनी भेट देत नातेवाईकांचे सांत्वन केले आणि शासनाकडून मदत मिळवून देण्याचे येईल आश्वासन दिले.








