राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेश सचिव वंदना चौधरींचे असेही दातृत्व

जळगाव (प्रतिनिधी) – जामनेर तालुक्याच्या शहरात असलेल्या रहिवासी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेश सचिव वंदना चौधरींचे दिवाळी सणाच्या काळात प्रशंसनीय दातृत्व दिसून आले.
दिवाळीच्या काळात घरोघरी ” दिवाळी ” मागणारे समाजातील विविध घटकातील वंचित नागरिक प्रत्येकाला दिसून येतात, हि मंडळी दिवाळीच्या काळात फराळ, कपडे व काही पैशांची मागणी करतांना देखील दिसतात. असाच एक पोतराज जामनेर शहरात घरोघरी “दिवाळी” मागण्यासाठी पत्नी व मुलांसह रविवारी १५ नोव्हेंबर रोजी फिरत होता. शरीरावर चाबकाचे फटके मारीत लोकांचे लक्ष वेधत तो वस्तूंची व पैशांची मागणी करीत होता.
असाच फिरतफिरत तो वंदना चौधरी यांच्या दारी आला. या पोतराजाची स्थिती पाहत वंदना चौधरी यांनी तात्काळ त्याला बोलावून घेत सामाजिक बांधिलकी जोपासली. पोतराजाच्या पत्नीला नवी साडी, मुलीला ड्रेस आणि सोबत फराळ व पैसे दिले. त्याच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान बोलके होते. यावेळी वंदना चौधरी म्हणाल्या की, आजकाल पोतराज दिसतही नाही. त्यांना घरदार नसते. ढोल वाजविण्याचा व चाबूक मारण्याचा आवाज आल्यानंतर पहिले तर, संबांधित पोतराज परिवारासह पैसे मागत होते. त्यामुळे त्यांना थोडीशी मदत केली. असेही ते म्हणाले.







