नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोनाच्या जीवघेण्या संकटाचा सामना करत दिवाळी देशभर मोठ्या उत्साहाने सुरू आहे. पण सणासुदीच्या काळात बँकेत जाण्यापूर्वी बँक सुरू आहे की नाही याची खात्री नक्की करून घ्या.


कारण, संपूर्ण महिन्यात मोठे सण असल्यामुळे बँकांना सुट्टी आहे. दिवाळीच्या दुसर्या दिवशीपासून सलग अनेक दिवस बँक बंद असणार आहेत. 16 नोव्हेंबरला देशातील अनेक राज्यांमध्ये बँका बंद असणार आहेत.
यंदा 16 नोव्हेंबरला भाऊबीज असल्यामुळे बँका बंद असणार आहेत.दिवाळीनंतरही बँका सलग दोन दिवस बंद असणार आहे. 20 आणि 21 नोव्हेंबर रोजी बिहार आणि झारखंडमध्ये छठ पूजा असल्यामुळे व 28, 29 आणि 30 नोव्हेंबर रोजी बँका बंद राहतील.







