नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – दिवाळीला शुभेच्छा संदेश पाठवण्याचा उत्साह सणासुदीला वाढतो. दिवाळीनिमित्ताने आपल्या खास मित्रांना आणि नातेवाइकांना विश करण्यासाठी व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी दिवाळी थीम बेस्ड अॅनिमेटेड स्टीकर आणले आहेत. याशिवाय यूजर्स व्हॉट्सअॅपवर आपले पर्सनलाइज्ड स्टिकर क्रिएट करून दिवाळी विश करू सकता. यासाठी व्हॉट्सअॅप सॅम्पल अॅप प्रोव्हाइड करते. सोबतच स्टिकर बनवण्यासाठी थर्डपार्टी अॅपचीसुद्धा मदत घेऊ शकता.

व्हॉट्सअॅप कम्युनिकेशनसाठी सर्वांत जास्त अॅनिमेटेड स्टिकरचा वापर केला जातो आणि यासाठी व्हॉट्सअॅपने दिवाळीच्या निमित्ताने हे खास अॅनिमेटेड स्टिकर लाँच केले आहे. ते कसे वापरायचे आहे ते जाणून घेऊयात.
स्टिकर्स डॉउनलोड करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा.
1 व्हॉट्सअॅप अपडेट नसेल तर ते अपडेट करून घ्या.
2 यानंतर ज्यास तुम्हाला दिवाळी स्टिकर्स पाठवायचे आहेत, त्यांचे चॅट ओपन करून स्टिकर आयकॉनवर क्लिक करा.
3 आयओएस प्लॅटफॉर्मवर हे टेक्स्ट बारच्या राईट साईडमध्ये मिळेल, तर अँड्रॉईडवर स्टिकर आयकॉन गीफ ऑपशननंतर येते.
4 आता स्टिकर आयकॉनला सीलेक्ट करा आणि प्लस सिम्बॉलवर क्लिक करा.
5 इतके केल्यानंतर आता ज्या स्टिकर पॅकला डाउनलोड करायचे आहे, त्यावर क्लिक करून डाउनलोड करा आणि शेअर करा.
स्वत:चे स्टिकर्स तयार करा
1 स्वत:चे स्टिकर्स क्रिएट करण्यासाठी सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवर जा आणि स्टिकर मेकर डाउनलोड करा.
2 यानंतर हॅप्पी दिवाली इमेजला सर्च करून डाउनलोड करा.
3 आता स्टीकर मेकर अॅपला ओपन करा आणि नंतर क्रिएट ए न्यू स्टिकर पॅकवर क्लिक करा.
4 आपल्या कस्टम स्टिकर पॅकवर आपले नाव लिहा आणि त्यानंतर अॅड स्टिकरवर क्लिक करा.
5 आपल्या गॅलरीतून पिक्चर्स सीलेक्ट करा आणि आपल्या हवे तसे कस्टमाइज करा.
6 यानंतर पब्लिश स्टिकर पॅकवर क्लिक करा. तुम्ही कस्टमाइज केलेले स्टिकर्स तुम्हाला व्हॉट्सअॅप स्टिकर लायब्ररीमध्ये दिसतील. जेथून तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता.







