• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एमआयडीसी पोलिसांनी मुंबईतून आलेल्या ” त्या ” तीस दुचाकी केल्या जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 14, 2020
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – नियमाप्रमाणे दुचाकी खरेदी केल्यानंतर आधी तात्पुरती नोंदणी करणे आवश्यक असते. असे असताना सुध्दा तात्पुरती नोंदणी न करता विना कागदपत्र ३० नवीन दुचाकी शुक्रवारी मुंबईतून जळगावात दाखल झाल्या. याबाबत शहरातील अधिकृत वाहन कंपन्यांच्या डिलर्सने तक्रार केल्यानंतर दुपारी एमआयडीसी पोलिसांनी त्या तीस दुचाकी जप्त केल्या आहेत.

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी पोलीस करीत असून चौकशीअंती कारवाई केली जाणार आहे. मुंबईतून जळगावात काही माल ट्रकांमधून नवीन दुचाकी विक्रीसाठी आल्याची माहिती किरण बच्छाव, टीव्हीएस कंपनीचे योगेश चौधरी, होंडी कंपनीचे प्रकाश जाखेटे यांना मिळाली होती. त्यांनी शुक्रवारी दीड वाजेच्या सुमारा अजिंठा चौफुली एमएच.४८.एजी.०४२६ या क्रमांकाचा आयशर ट्रक थांबविला असता, त्यामध्ये तीस नवीन दुचाकी दिसून आल्या. तिघांनी आयशर ट्रकचालक गुरूप्रसाद मिश्रा याला डिलीव्हरी चलन आहे का? अशी विचारणा केली. त्यावर त्याने नकार दिला व भिवंडीतून दुचाकी आणल्याची माहिती त्याने दिली. त्यामुळे शहरात अधिकृत डिलर्स असताना बाहेरून परस्पर विक्रीला दुचाकी आल्या कशा? असा सवाल उपस्थित करीत किरण बच्छाव यांनी एमआयडीसी पोलिसात चौकशीसाठी अर्ज दिला़ त्यानुसार पोलिसांनी आयशर ट्रकची पाहणी केल्यानंतर त्यांना त्यात २८ लाख १६ हजार ४५० रूपयांच्या तीस नवीन मोटारसायकली आढळून आल्या.
विशेष म्हणजे, दुचाकी खरेदी केल्यानंतर ती रस्त्यावर आणण्यापूर्वी तात्पुरती नोंदणी करणे आवश्यक असते. मात्र, त्या नवीन दुचाकींची तात्पुरती नोंदणी सुध्दा केलेली नसल्याचे पोलिसांच्या चौकशीत आढळून आले. फक्त विमा काढून त्या शहरात पाठविण्यात आल्या होत्या. चालकाला दुचाकींचे कागदपत्र विचारले असता, त्याने पोलिसांना कागदपत्र नसल्याचे सांगितले. अखेर संपूर्ण चौकशीसाठी एमआयडीसी पोलिसांनी त्या नवीन तीस दुचाकी जप्त केल्या आहेत. तर चालकाला संबंधित वाहनांचे आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी लेखी समज पोलिसांनी दिली आहे. तसेच चौकशीअंती कारवाई केली जाणार आहे. याप्रकरणी चौकशी पोलीस उपनिरिक्षक रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, मुकेश पाटील, सचिन पाटील करीत आहेत.

शोरूम पेक्षा कमी किंमतीत दुचाकी मिळत असल्यामुळे त्या बुकींग करण्यात आल्या असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. दरम्यान, याप्रकारे दुचाकी विक्री झाल्यास शहरातील अधिकृत डिलर्स यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो. यामागे मोठे रॅकेट असल्याची शक्यता असून याबाबत पोलीस तपास करीत आहेत.


 

 

Previous Post

शासकीय आयटीआय समोर दुचाकीचा अपघात ; महिला गंभीर जखमी

Next Post

मुस्लिम मनियार बिरादरीतर्फे आशादीप महिला वस्तीगृहात दिवाळीनिमित्त फराळासह कपडे वाटप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मुस्लिम मनियार बिरादरीतर्फे आशादीप महिला वस्तीगृहात दिवाळीनिमित्त फराळासह कपडे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,
1xbet russia

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

April 21, 2026
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक
1xbet russia

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon