चाळीसगाव (प्रतिनिधी) -तालुक्यातील अभोणे तांडा पाणी फाऊंडेशन सत्यमेव जयते वाँटर कप स्पर्धेत तालुक्यातून प्रथम आलेल्या गावातील एक ध्येयवेडा तरुण राहूल राठोड आपले गाव पाणीदार झाले म्हणून न थांबता तालुका ही पाणीदार करण्याचा ध्यास घेऊन मागील वर्षी चाळीसगाव तालुक्यात सुरु झालेल्या

शिवनेरी फाउंडेशन संचलित भूजल अभियानात सहभागी होऊन आपला अनुभव सत्मार्गी लागावा यासाठी प्रशिक्षण टिम तालुका समन्वयक म्हणून जबाबदारी स्विकारली व तालुक्यातील गावागावात जाऊन जलसाक्षर लोकांची एक फळी तयार करण्यास सुरुवात केली त्यामुळे या उपक्रमात सहभागी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात जलसंधारणाचे कामे उभी राहीली.
शिवनेरी फाऊंडेशन भूजल अभियान सहज जलबोध अभियान अंतर्गत पहीले खानदेशस्तरीय जल संमेलन नुकतेच चाळीसगाव येथे संपन्न झाले. याप्रसंगी तालुका समन्वयक म्हणून चांगली कामगिरी केल्याबद्दल राहूल राठोड यांचा चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. बि. एन. पाटील, सहज जलबोधकार उपेंद्र धोंडे, भूजल अभियानाचे संगणक अभियंता गुणवंत सोनवणे कृषी उपसंचालक अनिल भोकरे, प्रांत अधिकारी श्री.लक्ष्मीकांत साताळकर,तहसीलदार श्री.अमोल मोरे,बि डि ओ. नंदकुमार वाळेकर,जल तज्ञ सौ.अनुपमा पाटील, दिवाकर धोटे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.







