जळगाव (प्रतिनिधी) – येथील तहसीलदार कार्यालयात निवासी नायब तहसीलदारपदी दिलीप बारी रुजू झाले आहे. त्यांचे “केसरीराज” परिवारातर्फे स्वागत करण्यात आले आहेत.
दिलीप रामदास बारी हे मूळचे शिरसोली प्र. बो. गावचे रहिवासी आहेत. त्यांनी सोमवारी ९ नोव्हेंबर रोजी पदाचा पदभार स्विकारला. यावेळी तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच “केसरीराज” परिवारातर्फे त्यांचे मुख्य संपादक भगवान सोनार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी माजी सरपंच प्रदीप रावसाहेब पाटील, शशिकांत बारी, सामाजिक कार्यकर्ते गोरख अस्वार, कुणाल बारी, शुभम सोनार, राजू कोळी, मुन्ना कोळी आदी उपस्थित होते.








