शिरसोलीच्या संजय पाटील यांच्या सेवेचे कौतुक

जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथील सामाजिक कार्यकर्ते संजय पंडित पाटील उर्फ साई यांच्या कार्याची कौतुक होत आहे. त्यांनी अनेक लाभार्थ्यांना रेशनकार्ड काढून जनसेवा जोपासली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात संजय पाटील अग्रेसर आहेत. संजय पाटील यांनी शिरसोली येथे अनेक लोकांना वर्षभरापासून रेशन कार्ड काढण्यास मदत केली आहे. संजय पाटील यांच्या पत्नी शारदा पाटील या शिरसोली प्र.न.च्या ग्रा.प. सदस्य आहेत. त्यांनी लाभार्थ्यांना मदत केल्यामुळे त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.







