जळगाव (प्रतिनिधी) – औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनचे अध्यक्ष संजय तायडे यांनी सोमवारी उमेदवारी दाखल केली. त्यांना असोसिएशनचा जाहीर पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. याबाबत जळगावचे जिल्हाध्यक्ष अभियंता नरेश चौधरी यांनी माहिती दिली आहे.
महाराष्ट्रातील पदवीधर, सुशिक्षित बेरोजगार डॉक्टर, अभियंते, शिक्षक आदींच्या तसेच इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या समस्या शासन दरबारी प्रभावीपणे मांडता याव्या यासाठी संजयराव तायडे पाटील यांची उमेदवारी आहे. त्यासाठी पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत त्यांना भरघोस मतांनी निवडून देणे गरजेचे आहे. त्यासाठी “मेस्टा” च्या सदस्यांनी संजय तायडे पाटील यांच्या विजयासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन जळगाव जिल्हाध्यक्ष अभियंता नरेश चौधरी, व्ही.डी. पाटील, डॉ. शांताराम पाटील, कांतीलाल पाटील, पंडित नाना शिंदे, विद्या पाटील आणि पदधिकाऱ्यानी केली आहे.








