पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे शिष्टमंडळाला आश्वासन

जामनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील पहूर येथील शिवसेना शहर प्रमुख व विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यांच्या प्रेरणेतून तापी नदी डाव्या कालव्याने वाघुर नदीस जोडणे बाबत गेल्या आठ वर्षापासून सतत हिवाळी अधिवेशनात सतत मागणीचा पाठपुरावा केला होता. दि. 5 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे प्रस्ताव सादर केला असता त्यांनी या नदीजोड प्रकल्पासंदर्भात लवकरच बैठक बोलावण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी शिष्टमंडळाला दिले.
सदर प्रस्तावित प्रकल्प सुरुवात तापी पूर्णा संगमाजवळ चिंचोली तिथून सुरुवात करून चिंचोली ते चांगदेव कोथळी, बहाळी, अमदगाव, उजली, पळसखेडा, शेलवड, येवती, बेटावद, राजनी, कापुसवाडी, फत्तेपुर, किनी, तोंडापूर, कुंभारी मार्ग जगप्रसिद्ध अजिंठा लेणी येथील असलेल्या उगम स्थानावर जोडला.
पुढील तापी नदीसही पाणी मिळणार असून सदर प्रकल्प पूर्णत्वास आल्यास बोदवड – जामनेर तालुक्यातील सदर प्रश्नातील मार्गावरील गावे वाडे वस्ती हद्दीतील वनराई सिंचनाखाली येणारी हजार हेक्टर जमिनीला मदत होऊन होणाऱ्या उत्पन्न वाढीस मदत होईल. या डाव्या कालव्यासाठी जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनाही यावेळेस निवेदन सादर करण्यात आले. या वेळी शिवसेना शहर प्रमुख, वाघुर विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष सुकलाल बारी व विभाग प्रमुख तथा पत्रकार गणेश पांढरे यांनी याबाबत चर्चा केली. हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यास आशावादी असल्याचे सांगितले.







