पुणे (वृत्तसंस्था) – भोसरी औद्योगिक वसाहातीमधील गवळीमाथा येथील एका केमिकल कंपनीत भीषण आग लागली. शनिवारी (दि. 7) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहाणी झालेली नाही. आगीची माहिती मिळताच पिंपरी महापालिकेचे आणि एमआयडीसीचे असे 13 अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

अग्निशामक बंबाच्यावतीने आग नियंत्रणात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीत आतापर्यंत कोणीही जखमी नसल्याचे अग्निशामक दलाच्या जवानांनी सांगितले. मात्र कंपनीत मोठा शस्त्रसाठा असल्याची माहिती काही स्थानिक नागरिकांनी दिली. त्यामुळे अग्निशामक विभागाकडून खबरदारी घेतली जात आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.







