जळगाव (प्रतिनिधी) – येथील महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १५ चे नगरसेवक प्रशांत सुरेश नाईक यांनी कोरोनाच्या काळात आरोग्य क्षेत्रात चांगले कार्य केल्याबद्दल उपायुक्त पवन पाटील यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
कोरोना संक्रमणाच्या काळात सामाजिक बांधिलकी जोपासत नगरसेवक म्हणून कर्तव्य बजावले म्हणून महानगर पालिकेच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण – २०२१ अंतर्गत त्यांना सन्मानपत्र देण्यात आले. सन्मानपत्र देतांना नगरसेवक चेतन सनकत, अनिल करोसिया उपस्थित होत्या.








