जळगाव (प्रतिनीधी) – येथील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने गुप्त माहितीवरून एका दुचाकीचोरास गजाआड केले असून त्याच्याकडून ५ दुचाकी हस्तगत केलेल्या आहेत. त्याला ६ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

भैया उर्फ गोपाळ लुका बाविस्कर (वय ३२, रा. कन्हेरे, ता. अमळनेर ह.मु. खेडी बुद्रुक ता. जि . जळगाव ) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याने मोसीन शहा सलिम शहा, रा. रथचौक यांची दुचाकी एमएच ४८ एएस ८३०७ हि बाजार समितीजवळून चोरली होती. या दुचाकीसह एम एच १८ एइ २१९७ हि दुचाकी जप्त करण्यात आली होती. त्याच्याकडून आणखी तीन एम एच १९ ए एच ७०७८, एम एच १९ एसी ४३१३, एम एच १९ एसी ८९३ ह्या देखील दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला ६ नोव्हेम्बर पर्यंत कोठडी देण्यात आली. कारवाई प्रकरणी पोउनि रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, पोना इम्रान सय्यद, पो कॉ किशोर पाटील, सुधीर साळवे, चेतन सोनवणे, मुकेश पाटील, योगेश बारी, सचिन पाटील, हेमंत कळसकर, गणेश शिरसाळे, चंद्रकांत पाटील आदींनी सहभाग घेतला.







