पारोळा (प्रतिनिधी) – पारोळा येथील तालुका मंडप असोसिएशन, केटरर्स, बँड, घोडा व फोटोग्राफर यांनी एकत्र येत त्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसीलदार पारोळा यांना निवेदन दिले.
सामाजिक कार्यक्रमामध्ये हॉल किंवा लॉनच्या क्षमतेपेक्षा अर्ध्या लोकांच्या आसन क्षमतेची परवानगी मिळावी अथवा पाचशे आसन क्षमतेची परवानगी मिळावी. मंडप, मंगल कार्यालय, केटरिंग आणि इतर या व्यवसायासाठी संबंधित जीएसटी 18 टक्के ऐवजी 5 टक्के करावी. यांसह अनेक मागण्या निवदेणात नमूद केल्या असून शासनाने त्वरित मागण्यांसंदर्भात सहानुभूतीपर विचार करावा असेही निवेदनात म्हटले आहे.
यावेळी बापू नथु कुंभार, मोतीलाल सुका बारी, उदय वना शिंपी, दीपक शिंपी, अरुण पाटील,गोपाळ साळी, संजय चौधरी,गुरव नाना,संदीप पाटील हे उपस्थित होते.








