वडती ता.चोपडा (प्रतिनिधी) – तालुका व शहर काँग्रेस तर्फे 31 ऑक्टोबर हुतात्मा दिवस हा किसान अधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात आला. केंद्र सरकारने शेतकरी व कामगार यांचेसाठी केलेले कायदे हे घातक असून शेतकरी व कामगार देशोधडीला लागणार आहे. हे काळे कायदे रद्द करण्यासाठी आज रोजी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली चोपडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सुरवातीला आद्य कवी महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या जयंतीनिमित्त, लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व भारत रत्न मा . इंदिराजी गांधी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्या सर्वांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
या वेळेस सर्व महामानवांच्या नावांचा जयघोष करण्यात आला. जय जवान जय किसान, भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या. अनेकांनी प्रतिमा पूजन करून अभिवादन केले. यावेळी तालुका अध्यक्ष राजाराम बाबुराव पाटील, शहर अध्यक्ष के. डी. चौधरी सर, ऊपाध्यक्ष ॲड. एस डी पाटील, सरचिटणीस शिरीष बडगुजर, शैलेश वाघ, ईलियास पटेल, चेतन चौधरी, शशिकांत साळुंखे, अशोक साळुंखे यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष किरण सोनवणे, एनएसयूआय अध्यक्ष चेतन बाविस्कर, शेख आरिफ शेख सिद्दीकी, सूत गिरणी संचालक राजेंद्र भास्करभास्करराव पाटील, मार्केट कमिटीचे मा . उपसभापती नंदकुमार सांगोरे गुलाब चौधरी, गणेश चौधरी, समाधान मोरे, गोपीचंद रघुनाथ चौधरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.







