मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे राज्य सरकारने मोठं पाऊल उचलले आहे. मुंबई-पुणे दृतगती मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पुणे-मुंबई प्रवास करणारे नागरिक जास्त असतात. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे, सरकारने हा निर्णय घेतला आहे.मुंबई-पुणे दृतगती मार्गाच्या दोन्ही द्वारावर बॅरेगेट्स लाऊन ठेवले आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.दरम्यान, मुंबई आणि पुण्यात एका रात्रीतून कोरोनाच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर एका स्थानिकाला कोरोनाची बाधा झाल्यामुळे जास्त दक्षता घेतली जात आहे.