जळगाव (प्रतिनिधी) – न्यु सम्राट कॉलनी येथे दिवाळीसाठी लागणाऱ्या तेलाचे २३ डबे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.

अर्जूनराम पोखरराम प्रजापत (वय-४६) रा. न्यु सम्राट कॉलनी जळगाव हे केटरींगचा व्यवसाय करतात. घराच्या बाजूला एका खोलीत त्यांच्या व्यवसायाचा सामान ठेवला जातो. २९ ऑक्टोबर रोजी सकाळी नेहमीप्रामाणे खोलीवर गेले असता दिवाळी सणासाठी लागणारे तेल घेण्यासाठी १५ किलो वाजनाच २२ डबे व इतर सामान भरून ठेवले होते. त्यानंतर ९ वाजता कंपाउंडचे गेट बंद करून निघून गेले. दरम्यान ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास दुकानावर गेले असता खोलीतील तेलाचे डबे चोरी केल्याचे दिसून आले. ३४ हजार २१० रूपये किंमतीचे २२ तेलाचे डबे चोरीस गेल्याप्रकरणी अर्जून प्राजपत यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सिंगापूरवाडा येथून संशयित आरोपी गोवींदा गणेश बागडे (वय-३०, रा. संजय गांधी नगर, कंजरवाडा) याला अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातील २३ हजार ३२५ रुपये किंमतीचे १५ तेलाचे डबे हस्तगत केले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आज न्यायलयात हजर केले असता न्या. सुवर्णा कुळकर्णी यांनी दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे ॲड. प्रिया मेढे हे कामकाज पाहत आहे.
पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, हेमंत कळसकर, किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, मुकेश पाटील, सुधीर साळवे, सचिन पाटील, योगेश बारी यांनी कारवाई करत आरोपीस अटक केली व मुद्देमाल हस्तगत केला आहे. या गुन्ह्यातील दुसरा आरोपीचे नाव निष्पन्न झाले असून त्याचाही शोध घेणे सुरू आहे.







